Type Here to Get Search Results !

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रेवदंडा येथे स्वच्छता अभियान

कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर)थोर निरुपणकार समाजसेवक महाराष्ट्र भूषण आ.डॉ.ति.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रेवदंडा येथे विविध ठिकाणी स्वच्छता ही सेवा ब्रीदवाक्य घेऊन स्वच्छता अभियान राबवून श्रीसदस्यांनी गावात जाणारे रस्ते, प्राथमिक शाळा, मंदीर,मशीद,स्मशानभूमी, बाजारपेठ, समुद्र किनारा रस्ते चकाचक केले! 

  महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये सामाजिक जनजागृती,सर्व स्वच्छता अभियान,आरोग्य जनजागृती,आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे,स्टेमसेल शिबिरे,वृक्ष लागवड व संवर्धन,गांडूळ खत प्रकल्प,जनजागृती,जल व्यवस्थापन,सामाजिक अनिष्ट परंपरा निर्मुलन,व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा निर्मूलन, साक्षरता अभियान, व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण, नोकरी विषयक मार्गदर्शन,पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत वनराई बंधारे,विहिरी,कूपनलिका, पनर्जलभरण,शालेय शिक्षणासाठी शासकीय दाखले वाटप अभियान,नैसर्गिक आपत्ती मदत व्यवस्थापन, श्रवणयंत्र वाटप,दिव्यांग-मूकबधीर शाळा व्यवस्थापन, बालसंस्कार वर्ग,महिला स्वशक्तिकरण,सामाजिक कुप्रथा निर्मुलन आदी. विविध उपक्रम राबविले जातात. 

   आदरणीय डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवार दि.१ मार्च रोजी अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील रेवदंडा मिनिडोअर स्टॅंड ते गोळा स्टॉप, पारनाका, हायस्कूल स्टॉप, अमरधाम स्मशानभूमी, मारुती आळी, बापदेव मंदिर गल्ली, जैन समाज मंदिर मार्गे गोवा स्टॉप, चुनेकर आळी, गोरेगावकर गल्ली, रेवदंडा किल्ला ते समुद्र किनारा,बहिरी गल्ली अंतर्गत नारायण आळी, सुतार आळी, कुंभार आळी, गणपती आळी, अंतर्गत विठोबा आळी, वसईकर आळी,जुनी पोस्ट गल्ली,वाडी मोहल्ला, मोठा-मधला कोळीवाडा,भणसाळी आळी,आगर आळी मार्गे पागार मोहल्ला अंतर्गत मुख्य रस्ता आदी. ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येऊन यामध्ये १०५९६ चौ मी परीसरात २५.२ कि.मी. अंतर्गत व मुख्य रस्ते ३.६ कि.मी.रेवदंडा किल्ला ते अमरधाम स्मशानभूमी समुद्र किनारी २०.३ टन कचरा गोळा करण्यात येऊन रेवदंडा बायपास येथे योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली.या अभियानात १०९७ श्रीसदस्य सहभागी झाले होते.

________________________________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर