कोर्लई,ता.4(राजीव नेवासेकर)अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होईल की काय, या भीतीने मुरुड तालुक्यातील विहूर येथील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र मंगळवारी (३ मार्च) पहायला मिळाले.
सकाळपासूनच दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांनी इंधन भरण्यासाठी गर्दी केली होती.याबाबत आमच्या प्रतिनिधीने माहिती घेतली असता, केवळ संभाव्य टंचाईच्या
भीतीपोटी नागरिक इंधन भरण्यासाठी गर्दी करत असल्याचे स्पष्ट झाले. विहूर येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे. सध्या इंधनपुरवठा सुरळीत सुरू असून घाबरून साठेबाजी करण्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या