Type Here to Get Search Results !

एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटींवर मुरुड पोलिसांकडून कार्यवाही

कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर)मुरुड पोलिसांकडून रात्री समुद्रात गस्ती करीत असताना नानवेल दीप गृहापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर श्रीवर्धन येथील दोन बोटी संशयित्रीत रित्या मासेमारी करताना आढळून आल्या या बोटीमधील सर्वांची कसून तपासणी केली असता सदरची बोट एल इ डी द्वारे मासेमारी करताना आढळून आल्याने तसे साहित्य बोटीत आढळून आल्याने दोन्ही बोटी व साहित्य मुरुड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली असून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे.मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी ही धडक कार्यवाही केल्याने अवैध मासेमारिस आळा बसणार आहे.

श्रीवर्धन येथील धनलक्ष्मी बोट क्रमांक एम एच 03 -एम एम4094 या बोटीमधील  एल इ डी लाईट 10 नग, पाण्याखाली वापरण्यात येणारे  एल इ डी बल्ब 2 नग एक जनरेटर जप्त करण्यात आला आहे. वैष्णवी बोट क्रमांक एम एम 4197 बोटीमधील  एल इ डी लाईट 8 नग, पाण्याखाली सोडण्यात येणारे बल्ब 2 नग, एक जनरेटर ताब्यात घेण्यात आले आहेत. या दोन बोटीमधील श्रीवर्धन भरडखोल येथील मन्सूर हमीद सोलकर, वैष्णव वाघे, प्रमोद चौलकर , चंद्रकांत पाटील आदींवर रीतसर कार्यवाही मासेमारी अधिन्यमध्वारे करण्यात आली आहे. सदरची यशस्वी कार्यवाही पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. रसेडे, पोलिस उपनिरीक्षक साईनाथ दळवी, सहायक पोलिस उपनिरीक्षक नौका विभाग आगरदांडा तळ किरप्पा गायकवाड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नागेश भवर, पोलिस शिपाई अभय परंदवाल आदी ही महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर