Type Here to Get Search Results !

होळी,धुळीवंदन,गुढी पाडवा सण शांततेत साजरा करा : परशुराम कांबळे

कोर्लई,ता.२६(राजीव नेवासेकर) हिंदू परंपरेनुसार येणारे सण होळी,धुळीवंदन, गुढीपाडवा आणि तिथी नुसार येणारी श्री शिवजयंती शांततेत साजरी करण्यात यावी.असे आवाहन मुरुड पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटी व गाव पंचायत कमिटीच्या सभेत पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी केले.

   मुरुड तालुका पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य गणेश नाक्ती, पांडुरंग आगरकर,अशिलकुमार ठाकूर, महेश पाटील, ज्ञानेश्वर फलेभाई, अरविंद भंडारी, मंदाकिनी कासेकर, सर्व पोलीस पाटील, पोलीस, अंमलदार मकरंद पाटील, राकेश गायकवाड,अक्षय परंडवाल, निखिल सुर्ते, प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.समाजात सुरु असलेल्या घृणास्पद अशा सामाजिक बहिष्कार प्रथा याबाबत पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर