Type Here to Get Search Results !

मुरुड जंजिरा नगरपरिषदेतर्फे स्वच्छता अभियान

 

कोर्लई,ता.27 (राजीव नेवासेकर)स्वच्छ मुरुड सुंदर मुरुड अंतर्गत मुरुड जंजिरा नगरपरिषदेतर्फे एकदरा ब्रीज ते कोटेश्वरी मंदिर रस्ता,समुद्र किनारा चकाचक करण्यात आला.

  नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर,माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, हसमुख जैन ,प्रशासकीय अधिकारी-नंदकुमार आंबेतकर, सतेज निमकर,मुरूड माळी समाज अध्यक्ष -मंगेश पाटील,भंडारी समाज अध्यक्ष -मोहन करंदेकर,दिपक मयेकर,मनोहर बैले,पोलिस हवालदार-चद्रकांत जैतू , पोलिस हवालदार -  कर्मचारी,कस्टम अधिकारी - सवर्या सिंग,सतिष सावंत,प्रविण ठाकुर , अभिजित चांदोरकर, सहाय्यक फौजदार- सुनील पाटील, पोलिस उपनिरीक्षक- बळीराम केंद्र, पोलिस शिपाई- प्रशांत बेले, पोलिस शिपाई-कैलास निमसे, मनोहर कदम,

  नगरसेवक रुपेश पाटील, डॉक्टर मंगेश पाटील, नगरसेवक आदेश दांडेकर , नगरसेविका प्रमिला माळी,सोनल पाटील, उदय दांडेकर, कोस्ट गार्ड,अम्मी संस्थांचे स्वयंसेवक या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.या स्वच्छता अभियानात कोस्ट गार्ड, कस्टम विभाग,परेरा मॅडम यांच्या आम्ही संस्थेचा सहभाग होता.

     एकदरा ब्रीज,कोळीवाडा, मारुती नाका,तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, कोटेश्वरी मंदिर दरम्यान रस्ता व समुद्र किनारी कचरा घाण, प्लास्टिक-बाटल्या, वाहून आलेल्या तुटलेल्या अवस्थेतील जाळ्याचा कचरा,पाला पाचोळा असा तीन टन कचरा गोळा करून ट्रॅक्टर ट्रॉली द्वारे उचलून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली.यावेळी समुद्र किनारी क्लिनिंग मशीनचा वापर करण्यात आला.

     स्वच्छ मुरुड सुंदर मुरुड अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला असून दर महिन्याला अशाप्रकारे स्वच्छता अभियान राबविण्यात येईल.असे नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर