कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीतर्फे रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा नांदगाव नंबर 1, जि प शाळा नांदगांव 2, जि प शाळा नांदगांव नंबर 3, रा जि प शाळा दांडे, शाळा नांदगाव उर्दू या शाळांच्या दोन दिवसीय एकत्रित वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.ग्रामपंचायत सरपंच सौ.सेजल सुदेश घुमकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सुनील गवळी, नांदगाव केंद्राचे केंद्रप्रमुख दिनेश म्हात्रे, ग्रामपंचायत उपसरपंच मेघा मापगावकर,ग्राम पंचायत सदस्य श्रीमती रणदिवे,, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नांदगाव नंबर 1,सौ.वृषाली जोशी,ग्रामपंचायत सदस्य विशाल पाटील,अमिषा भोबू,नितेश रावजी तसेच,महेश मापगावकर,ज्योती किल्लेकर उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती नांदगाव नंबर तीन ,सर्व शाळांचे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सुनील गवळी यांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे महत्त्व स्पष्ट केले.तसेच हिंद दि चादर या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम घेण्याविषयी मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या