Type Here to Get Search Results !

मुरुडमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येऊन समुद्रकिनारा, स्टॉल्स परीसर केला चकाचक !

कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर)स्वच्छ मुरुड सुंदर मुरुड या उपक्रमांतर्गत पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे अध्यक्ष अरविंद गायकर यांच्या पुढाकारातून मुरुड समुद्रकिनारी विश्राम बाग आणि स्टॉल्स परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येऊन परीसर चकाचक करण्यात आला !

     पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर,सर्व सदस्य, नगरपरिषद कर्मचारी वर्ग,दिव्या सतविडकर उपाध्यक्ष देवेन सतविडकर ,दामोदर खैरगावकर शैलेश वाडेकर महेंद्र पाटील रुद्र अंबुकर मलखान इम्तियाज भाई शकील भाई दिवेश बोरदे दीपक जोशी व असंख्य व्यावसायिक या  स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

   सुंदर मुरुड स्वच्छ मुरुड हा स्वच्छता अभियान पद्मदुर्ग व्यवसाय करी मंडळाच्या माध्यमातून वर्षातून पाच ते सहा वेळा घेण्यात येईल.असे पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी सांगून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव व त्यांचे सहकारी कर्मचारी अधिकारी यांनी मास्क,हॅंडग्लोज,झाडू आदी.साहित्य उपलब्ध करून मोलाचे योगदान दिल्याबद्दल आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर