कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा क्रमांक १ मध्ये तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग समग्र शिक्षा समावेशित शिक्षण व पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदोष शिबिर घेण्यात आले.
सदर शिबिरात पनवेलच्या शंकरा आय हॉस्पिटलचे तज्ञ डॉ.मोहसीन सय्यद, डॉ.यश सावंत यांनी नांदगाव नंबर 1 शाळेतील 86 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली,तपासणीअंती 5 विद्यार्थांना चष्म्यासाठी संदर्भित करण्यात आले.यावेळी त्यांनी आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी. याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर विद्यार्थ्यांना शंकरा आय हॉस्पिटल मार्फत मोफत चष्मे पुढील पंधरा दिवसात मिळणार आहेत.
ग्रामपंचायत सरपंच सेजल सुदेश घुमकर,केंद्रप्रमुख दिनेश म्हात्रे व नांदगाव नंबर एक शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता खानावकर, शिक्षक हेमंत नांदगावकर,नितेश राऊत,अश्विन राठोड व विशेष शिक्षक सुनील काळे,संतोष पुकळे यांचे शिबिराच्या यशस्वितेसाठी सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या