कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील सर्वे येथील नऊगांव कुणबी समाज (सर्वे -विहूर विभाग) यांच्या सर्वे येथील नऊगांव कुणबी समाजाच्या सभागृहात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारिणीच्या निवडीत निलेश काशिनाथ खामकर यांची सर्वे-विहूर विभाग अध्यक्षपदी सर्वांनुमते सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याने सर्वत्र कौतुक व समाधान व्यक्त होत आहे.
नऊगांव कुणबी समाज सर्वे-विहूर विभागाची वार्षिक सर्व सभा बुधवार दि.११ फेब्रुवारी २०२६ रोजी समाजाच्या सभागृहात निलेश खामकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी समाजाच्या विविध अडिअडचणी समस्यांवर चर्चा विचार विनिमय करण्यात आला. यावेळी समाजाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये नऊगांव कुणबी समाज (सर्वे-विहूर) विभाग अध्यक्षपदी निलेश खामकर, उपाध्यक्षपदी मिलिंद महाडिक, सचिव अमित महाडिक, सहसचिव विलास मोरे, खजिनदार संतोष पोटले,सहखजिनदार दिपक नाईक, सल्लागार सुशील खोपकर यांची निवड करण्यात आली.यावेळी सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचितांचे अभिनंदन करुन पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
(फोटो घेणे)
________________________________________________

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या