Type Here to Get Search Results !

सकाळच्या वेळेत रेवदंडा -मुरुड एस.टी.सेवा सुरु करण्यात यावी



कोर्लई,ता.१३(राजीव नेवासेकर) अलिबाग येथून सकाळी ६.१५ वा.सुटणारी अलिबाग -मुरुड एस.टी. गाडी भरुन येत असल्याने रेवदंडा येथून सकाळी सातच्या दरम्यान रेवदंडा -मुरुड गाडी सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे.

  गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर सकाळच्या वेळेत येणारी अलिबाग -मुरुड गाडी भरुन येत असल्याने रेवदंडा,कोर्लई,बोर्ली मांडला, काशिद, नांदगाव मजगांव येथील शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि आय टी आय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच ऐन परीक्षेच्या काळात त्रास व हाल सहन करावा लागत आहे.

  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने व मुरुड आगार प्रमुख यांनी यात तातडीने लक्ष पुरवून सकाळी सातच्या दरम्यान रेवदंडा -मुरुड गाडी सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर