कोर्लई,ता.१५(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे माघ कृष्ण त्रयोदशी तथा महाशिवरात्री निमित्ताने श्रीशंकर मंदिरात दर्शनासाठी यशवंतनगर पंचक्रोशीतील हजारो अबालवृद्ध भक्तगणांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
मंदिराचे तसेच गावच्या पंच कमिटीचे पुजारी विवेक वामन तथा बाळा ठोसर तसेच सिद्धेश दत्तात्रय पाटील यांनी पहाटे मंदिरात पुजा केली.त्यानंतर भाविकांची मोठी रांग दर्शनासाठी मंदिरात लागली होती.पंच कमिटी अध्यक्ष उमाकांत रघुनाथ चोरघे व अन्य सदस्य या प्रसंगी उपस्थित होते.श्री शंकराला आवडणार्या बेल, पांढऱ्या रंगाची फुले, नारळ,दूध आदी साहित्य अर्पण करून भक्तांनी महादेवाची करुणा भाकली.या निमित्ताने मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गावातील भजनी बुवांनी संगीत भजने सादर केली.रात्री उशिरापर्यंत तालुक्यातील अन्य ठिकाणच्या भक्तांनीही या प्राचीन मंदिरात येऊन दर्शन घेतले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या