कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर) अलिबाग तालुक्यातील आवास फाटा ते सासवणे या रस्त्याची गेल्या दोन वर्षांपासून खाच खळगे व खड्ड्यांमुळे पार दुरावस्था झालेली असून या रस्त्याची दुरुस्ती डांबरीकरण कधी करणार ? असा सवाल खड्डे ॲक्टिव्हिस्ट दिलिप जोग यांनी केला असून याबाबत जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना एक निवेदन देण्यात आले आहे.
अलिबाग - रेवस रस्त्यावर पर्यटन दृष्ट्या, शालेय, महाविद्यालय विद्यार्थी व प्रवासी वर्गासाठी अतिशय महत्त्वाचा असलेल्या आवास फाटा ते सासवणे चार ते पाच कि.मी.असलेल्या रस्त्यावर दोन वर्षांपासून खाच खळगे व खड्ड्यांमुळे पार दुरावस्था झालेली असून याकडे संबंधित खात्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येत आहे.
सदर रस्त्याचे बांधकाम व डांबरीकरण कधी करण्यात आले? त्यासाठी जनतेच्या करांतील किती रक्कम खर्च करण्यात आली? त्यानंतरही दरवर्षी दुरूस्ती / देखभालीसाठी किती रक्कम खर्च केली? त्यांचा DLP किती होता? त्याबाबत आपल्या खात्याने काही पत्रव्यवहार केला असल्यास त्याचीही माहिती मला मिळावी अन्यथा R.T.I. अर्ज करावा लागेल. तसेच या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल आपण काही पाहाणी अहवाल तयार याबाबत माहिती मिळावी व यात तातडीने लक्ष पुरवून आवास फाटा ते सासवणे या रस्त्याची दुरुस्ती डांबरीकरण करण्यात यावे.अन्यथा मला याविरोधात आंदोलन करावे लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहील.असे खड्डे ॲक्टिव्हिस्ट दिलिप जोग यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या