कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर)अपघात झाल्यास प्रसंगी शासनाच्या आरोग्य विभागाच्या 108 रुग्णवाहिकेचा वापर करा.असे आपत्ती व्यवस्थापन तज्ञ तथा महाराष्ट्र भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी गुरु संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त अलिबाग तालुक्यातील बंजारा समाज कामगारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी अलिबाग नगराध्यक्ष कु.नाईक,उपनगराध्यक्ष ॲड.मानसी म्हात्रे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक प्रशांत नाईक,रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील, अलिबाग पोलीस निरीक्षक साळी मान्यवर उपस्थित होते.
कामगारांनी काम करीत असतांना वेळप्रसंगी अपघात झाल्यास बीव्हीजी कंपनीची 108 रूग्ण वाहिकेला बोलवावी आणि ती मोफत असते असे सांगण्यात आले. यावेळी बंजारा समाजातर्फे प्रमुख मान्यवरांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी सदिच्छा भेट देऊन सेवालाल जयंती निमित्ताने शुभेच्छां दिल्या. यानंतर कामगार बंधु भगिनींना आपण कामगार दुत आहात,सर्व समाजाला आपली नितांत गरज असुन महिलांनो तुमच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस 112 क्रमांकावर संपर्क साधून सुरक्षित रहा.आज आपल्या येथे अलिबाग पोलीस ठाण्यातील निरीक्षक साळी आले असून त्यांनी रक्त दान करून देश सेवा केली तसेच युवकांनी रक्तदान करावे.
आपल्या पत्नीस बाळंतपणात गरज असल्यास ते जिल्हा रुग्णालयात मोफत मिळेल.आपल्या मुली आणि सुनांना बाळंतपणात महाराष्ट्र
शासनाची 102 मोफत रूग्ण वाहिका घराजवळ येईल.यावेळेस 108चे जिल्हा प्रमुख अजय जगताप यांना संपर्क साधताच पेझारी येथुन डॉ.अंकिता लांडगे व पायलट सिध्दातं म्हात्रे हे 108 रुग्णवाहिका घेऊन आले.त्याचेही स्वागत समितीनेकेले.
यावेळी अलिबाग नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोरख राठोड, शंकर जाधव, अनिल राठोड, चंदर पवार, शिवराम जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.सुत्रसंचालन प्रकाश राठोड यांनी केले तर नामदेव पवार यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या