कोर्लई,ता.16(राजीव नेवासेकर) मुरूड तालुव-यातील वनविभागाच्या क्षेञात येणा-या तेलवडे गावाच्या जवळील क्षेञात बेकायदेशीर सोलीव खैर लाकडाची तर-करी होत असल्याचे अज्ञात व्यक्तीकडून खबर मिळताच मुरुडच्या वनविभागाने कारवाई करत तेलवडे आदिवासी भागात खैरा लाकडाच्या २५ सोलीव नगासह दोन लाख बारा हजाराचा मुद्देमाल जप्त करुन दोन जणांना ताब्यात घेण्यात येऊन कारवाई करण्यात आली आहे.
मुरुड वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा पौळ व वनरक्षक मुरुड राऊंड स्टॉफ दि.११ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.०० ते ९.०० च्या सुमारास तेलवडे आदिवासी परिसरात गस्त घालत असताना MH-46 AP-3299 या क्रमांकाची सिल्व्हर ग्रे रंगाची इको कार विनापरवानगी अवैध रित्या खैर सोलीव २५ नगासह वाहतूक करीत असताना आढळून आली.सदर इको कार, मोबाईल सह मुद्देमाल जप्त करण्यात येऊन वाहन चालक व सहकारी रमेश नारायण वाघमारे व राहुल रमेश वाघमारे यांना ताब्यात घेण्यात आले.
सदर प्रकरणी वनविभागाने वन गुन्हा दाखल करण्यात आला असून उपवनसंरक्षक रोहा,सहाय्यक वनसंरक्षक रोहा, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा पौळ, वनपाल राहुल कुलकर्णी, वनरक्षक विशाल ढोबळे पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या