कोर्लई,ता.२०(राजीव नेवासेकर)प्राचीन काळापासून ऐतिहासिक सुप्रसिद्ध असलेल्या,भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या, भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुरुड तालुक्यातील श्री सिध्दिविनायक देवस्थानचा माघी गणेशोत्सव चतुर्थी गुरुवार दि.२२ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात साजरा होत असून सोमवार दि.१९ पासून विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
यानिमित्ताने दरवर्षी याठिकाणी मोठी यात्रा भरते. संपूर्ण महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून भाविक याठिकाणी भेट देत असतात.
नांदगांवच्या श्री सिध्दिविनायक देवस्थान ला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून हा जन्मोत्सव चिटणीस -गुप्ते कुटुंबियाकडून गेली शेकडो वर्षे अव्याहत पणे आजतागायत सुरु आहे. श्रीसिध्दिविनायक देवस्थान चा इतिहास साधारणपणे ५०० वर्षांपासून चा असून पंचांगकार गणेश दैवेज्ञ यांनी ह्याच मंदिरात गणेशाच्या आशिर्वादाने पंचांगाची रचना केली. आजपर्यंत ह्याच पंचागणाचा संदर्भ घेऊन पंचांगाची रचना केली जाते. माघ शुद्ध प्रतिपदा पासून हा जन्मोत्सव सुरु होऊन पंचमीच्या दिवशी संध्याकाळी ललिता किर्तनाने जन्मोत्सवाची सांगता होते. ह्या पाच दिवसात विविध कार्यक्रमात पहाटेच्या वेळी श्री मुर्तीची विधीवत पूजा-अर्चा, महानैवेद्य, सायंकाळी सुश्राव्य बहारदार भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. माघ शुद्ध विनायकी चतुर्थी दिवशी (आज)पहाटे २.०० वा.श्री च्या पंचोपचार पुजूने प्रारंभ होतो. त्यानंतर श्रीगणेश जन्मोत्सवाचे किर्तन होते. यादिवशी मोठी यात्रा भरते. राज्यातून आजूबाजूच्या परीसरातून भाविक गणेश दर्शनाचा लाभ घेतात. दर्शनासाठी लाबंचलांब रांगा लागल्या असतात.
यादिवशी चिटणीस-गुप्ते कुटुंबियांकडून आलेल्या भाविकांना सुंठवडा प्रसाद दिला जातो. दुसऱ्या दिवशी पहाटे३.०० वा.पासून श्री ची पूजा काकड आरतीने सुरू होते. ह्या दिवशी श्री मुर्तीला पंचामृताने स्नान घालून वस्त्र अलंकार अर्पण केली जातात. टाळ मृदुंगाच्या गजरात व गुलाल रंगात व भजनात भक्तगण तल्लीन होतो.दुपारी २१ गोड पदार्थ व षडरस अन्नाचा नैवेद्य श्रीं ना अर्पण केला जातो. याच दिवशी सायंकाळी ललिताच्या किर्तनाने उत्सवाची सांगता होते.श्री सिध्दिविनायक देवस्थान विश्वस्त मंडळ गिरीश गुप्ते,संजीव गुप्ते, कमलेश चिटणीस व अनिरुद्ध चिटणीस यांच्या मार्फत मंदिराची व्यवस्था सांभाळली जाते व त्याला चिटणीस-गुप्ते कौ.ट्रस्ट परीवाराची उत्तम प्रकारे साथ लाभत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या