कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर) श्री जगद्गुरु नरेंद्र महाराज नाणीज धाम (महाराष्ट्र) यांच्या प्रेरणेने आयोजित जीवनदान महाकुंभ -२०२६ उपक्रमात दि.४ जानेवारी ते दि. १८ जानेवारी दरवर्षी प्रमाणे १५ दिवस चालणाऱ्या या महाकुंभाद्वारे रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा महान उपक्रम संस्थानतर्फे राबविण्यात येत असून त्याचाच भाग तालुक्यातील मुरुड -मजगांव व साळाव मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याचाच भाग या उपक्रमांतर्गत आज दि.१६ जानेवारी रोजी मुरुड येथील जय मल्हार कोळी समाज हॉलमध्ये जगद्गुरु नरेंद्र महाराज यांना वंदन करून मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
मुरुड तालुका सेवा समिती अध्यक्ष अंकुश वाडकर,जितेंद्र पाटील, नरेंद्र हेदुलकर, मधूकर ठाकूर,अनंत भगत, अंजली जगताप, किशोर भगत,सुधीर पूलेकर,संतोष चोरघे, निखिल पाटील, प्राची पाटील, मधूकर जासुद, बाबा डयला,किरण पाटील,ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
पुणे येथील ओम ब्लड बँकेच्या डॉ.प्रियंका गावडे यांनी व त्यांच्या टिमने रक्त संकलन केले.यावेळी आजुबाजूच्या परिसरातील शेकडो रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या