कोर्लई,ता.१८(राजीव नेवासेकर) पर्यटनात जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या विकेंड ला रविवारी मुरुड-काशिद बीचवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल दिसून येत होती.सकाळच्या वेळेत थंडी तर दुपार नंतर हवामानात बदल होत काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी ऊन,वारा,थंडी अशा मोसमात पर्यटकांनी समुद्रात पोहोण्याचा, समुद्र सफरीचा मनसोक्त आनंद लुटला !
मुरुड-काशिद बीचवर पर्यटकांची मागील विकेंड ला गर्दी पाहावयास मिळाली होती. जानेवारी महिन्यातील काही दिवसांपासून थंडी मधे होणारा चढ उतार, अचानक वाढणारे तापमान याचा काही प्रमाणात पर्यटनावर परिणाम दिसून येत होता.या महिन्यात शालेय सहलींचा वाढता ओघ दिसून येत होता.
पर्यटनात पुणे, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, नागपूर, धुळे यवतमाळ अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून व देश विदेशातून पर्यटक आवर्जून काशिद बीच व मुरुडला भेट देत असतात.
काशिद बीच समुद्रकिनाऱ्यावरील रुपेरी वाळू, निळाशार समुद्र, मुरुडच्या समुद्रामध्ये मध्यभागी असलेला पद्मदुर्ग, मुरुडला असणाऱ्या नारळी पोफळीच्या बागा यामुळे पर्यटक मुरुड कडे आकर्षित होत आहे. काशीद बीचवर असणारी रुपेरी वाळू, उंच उंच सुरुची झाडे त्यामुळे पर्यटक काशीद बीचला ही मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.परंतु जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या विकेंड ला रविवारी काशिद बीचवर मोठ्या प्रमाणात पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसून येत होते.
________________________________________________________

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या