कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील मजगांव येथील नवतरुण मित्र मंडळ व आगरी समाज यांच्या संयुक्तविद्यमाने मजगांवच्या विठ्ठल रखुमाई क्रीडा संकुलात झालेल्या दोन दिवसीय कब्बडी स्पर्धेत नांदगाव वादळ खारिकवाडा संघाने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.गेली ४५ वर्षांपासून या ठिकाणी कब्बडी स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.
या दोन दिवसीय कब्बडी स्पर्धेत मधल्या काळात महिलांसाठी विशेष तरुण मित्र मंडळातर्फे कोळी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.या कब्बडी स्पर्धेत ५२ संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.यावेळी वादळ खारिकवाडा संघ, नांदगाव व मजगांवच्या भैरवनाथ संघात झालेल्या अंतिम स्पर्धेत नांदगाव-वादळ खारिकवाडा संघाने प्रथम क्रमांक पटकावला !, मजगांव भैरवनाथ संघाने दुसरा, मजगांव फ्रेंड्स संघाने तिसरा तर मोरे येथील जय हनुमान संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला.सामनावीर व मालिकावीर ओंकार मिस्त्री याला देण्यात आले तर उत्कृष्ट पकड दिपेश गिरणेकर आणि उत्कृष्ट बचाव दिनेश गाणार याला देण्यात आले.यावेळी स्पर्धेचा एक भाग म्हणून प्रेक्षक हिरो अनिकेत पाटील याला स्कुटी बक्षीस देण्यात आली.
नवतरुण मित्र मंडळ व आगरी समाज यांच्या संयुक्तविद्यमाने गेली ४५ वर्षांपासून कब्बडी स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे मंडळ सदस्य मंगेश कमाने यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या