कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर)मुरुड शहरामधील ग्रामीण रुग्णालयाच्या (एल.के.बी)हॉस्पिटलच्या समोर परवेज खान जादा यांच्या वाडीत शनिवारी रात्री दहाच्या सुमारास एक खवल्या मांजर आढळून आले असल्याचे वनविभागाला भ्रमणध्वनीवरून समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून वनपाल राहुल कुलकर्णी यांच्या टिमने परवेज खान यांच्या वाडीत जाऊन खवल्या मांजराला पकडून जवळील जंगलात सुरक्षितपणे सोडून जीवदान दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
खवल्या मांजर (पॅंगोलिन) हा फॉलिडोटा वर्गातल्या मॅनिडी कुळातील मॅनिस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. हा आफ्रिका व आशिया येथील उष्ण कटिबंधीय भागांमध्ये आढळतो. ज्याची त्वचा खवल्यांनी आच्छादलेली असते असा हा एकमेव सस्तन प्राणी आहे. हे खवले शृंगप्रथिन या पदार्थापासून बनलेले असतात.
मुरुड शहर तालुक्यात अन्यत्र कोठेही असे वन्यजीव आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा,आपले सहकार्य वन्यजीव बचावासाठी अभिनंदनास्पद राहिल.असे वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा पौळ यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या