Type Here to Get Search Results !

पद्मदुर्ग गडावर अवतरली शिवशाही! शेकडो शिवप्रेमीच्या उपस्थित पद्मदुर्ग जागर सोहळा संपन्न

कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर)मुरुड पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्था , कोकण कडा मित्र मंडळ रायगड व सर्व संलग्न शिवप्रेमी संस्थां याच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १७ वा पद्मदुर्ग जागर सोहळा हजारो शिवप्रेमी-गडप्रेमींच्या उपस्थितीत पार पडला.

 या दिवशी सकाळी शिवप्रेमींनी डोक्यात भगवे फेटे घालून मुरुड राधाकृष्ण मंदिरा पासुन शिवपालखीला सुरुवात करण्यात आली, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय !जयभवानी जय शिवाजी,हर हर महादेव,कोटेश्वरी मातेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता ही पालखी खोरा बंदरा पर्यत आणण्यात आली. त्यानंतर बोटीने पालखी पद्मदुर्ग किल्लात आणण्यात आली.सकाळ पासून शिवप्रेमी यांनी किल्लात येऊन पुन्हा किल्ला स्वच्छ व चकाचक करण्यात आला होता.त्यानंर संपुर्ण गडाला  फुलांने सजवले.ठिक ठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले.यामुळे भगवेमय वातावरण तयार झाले होते.


सकाळी ०९.३० वाजता अच्युत चव्हाण व त्यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण यांच्या शुभहस्ते गडाची श्री. कोटेश्वरी मातेची पूजन करण्यात आले.

डॉ.मयुर कल्याणी व त्यांच्या सौभाग्यवती डॉ.भाविका कल्याणी यांच्याहस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.व शिवप्रतिमेला मुद्रांचा अभिषेख करण्यात आले.यावेळी मंत्राच्या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला.सारे वातावरण शिवकालीन झाले होते.हजारो श्रोते पडणारे मंत्र व व्याख्यान अगदी मन लावून ऐकत होते.

     इतिहास अभ्यासक- प्रतिक कालगुंडे यांनी शिवरायांची राजनीती व सर्वसमभाव सर्व जातीचे मावळे घेऊन स्वराज्य घडवले ते कसे त्यांच्या व्याखनात सांगितले तसेच शिवरायांच्या राजनीती बाबत या चित्तथराक कथा सांगून शिवरायांचे मावळे बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड स्वराज्यासाठी कशी लढवली याचे रोमहर्षक वर्णन करून शिवप्रेमीना एक नवा जोश दिला तद्नंतर शिवप्रेमींनी  विविध शिवकालीन शौर्याचे खेळ बाणापट्टा ,तलवारबाजी मलखांब ,पारंपरिक गोंधळ सादर करण्यात आला.

यावेळी डॉ.राज कल्याणी यांच्या कडुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तद्नंतर गड स्वच्छता करणात आली. 

   यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, मुरूड पद्मदुर्ग जागर व गडभ्रमण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिलकुमार  ठाकुर ,राजपुरोहित-प्रकाश स्वामी जंगम,राहुल कासार, रुपेश जामकर, डॉक्टर -मयुर कल्याणी, डॉक्टर भाविका कल्याणी,कोकण कड़ा मित्र मंडळ रायगड -शेखर मामा फरमन , रोहित पवार ,उपाध्यक्ष -संकेत वडके,सुरेश पवार ,अनिकेत कदम ,,प्रकाश दाभेकर ,विजय वाणी,प्रदिप बागडे, महेंद्र मोहिते , संदिप घरत,नेहा पाके, बाळा साखरकर,मिलिंद भगत,महेश साळुंखे,प्रविण पाटील,रुपेश रणदिवे, अच्युत चव्हाण, अनुराधा चव्हाण, अमित पाटील,सतेज विरकुड, प्रकाश वाडकर आदिंसह शिवप्रेमी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, राज्य सरकार व केंद्र सरकार अरबी समुद्रात नवीन छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक उभे करत आहेत.त्याच्या पेक्षा महाराजांना मानवंदना द्यायची असेल तर मुरूड येथील समुद्रात असणाऱ्या श्री छत्रपती शिवरायांचा जीवंत पद्मदुर्ग किल्लाचे जतन व संवर्धन करा.असे आवाहन माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पद्मदुर्ग जागर सोहळा कार्यक्रमावेळी केले.मुरूड पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्था , कोकण कडा मित्र मंडळ रायगड व सर्व संलग्न शिवप्रेमी संस्थांच्या वतीने पद्मदुर्ग सोहळा गेली १७ वर्षं करित आहेत.या सोहळाच्या माध्यमातून गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन साठी विशेष प्रयत्न करत आहेत.शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे ज्या वास्तू आहेत त्या पुढच्या पिढी पर्यत पोचविण्याचा प्रयत्न ही करतात त्यांना मानाचा मुजरा.किल्लाचे संवर्धन व जतन करण्याकरिता मी शिवभक्त म्हणून अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.याठिकाणी येणाऱ्या शिवभक्त चा मार्ग सुकर व्हावा यासाठी जेट्टी असेल प्रवासी जेट्टी त्याबरोबर पावसाळ्या दरम्यान सुध्दा शिवभक्त येथे कसे येतील त्याकरिता आम्ही प्रयत्न करणार याठिकाणी किल्ल्याचे संवर्धन व जतन अत्यंत जरुरी आहे.मुरुड शहरात ही भव्य महाराजांचा स्मारक बांधा तसेच पद्मदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा व संभाजी महाराजाचा स्मारक या ठिकाणी झाले पाहिजे.त्यासाठी आम्ही केद्र सरकार व राज्य सरकाराला आम्ही विनंती करणार आहोत.असे मत यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर