Type Here to Get Search Results !

मुरुडमध्ये स्विकृत नगरसेवक पदासाठी रुपेश पाटील : नगरपरिषदेत जल्लोषात अर्ज केला दाखल

कोर्लई,ता.१४(राजीव नेवासेकर) अलिबाग -मुरुड मतदार संघाचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड जंजिरा नगरपरिषदेत सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेना व कॉग्रेस पक्षाच्या नगरसेवकांसमवेत मान्यवरांच्या उपस्थितीत ॲड.रुपेश शंकर पाटील यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांजकडे स्विकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला.यावेळी तमाम शिवसैनिकांनी घोषणा देत जल्लोषात श्री छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

   यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, गटनेते पांडुरंग आरेकर, बांधकाम कामगार सेना तालुका अध्यक्ष दिनेश मिणमिणे, रायगड जिल्हा महिला आघाडी जिल्हा प्रमुख तृप्ती पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक विजय पाटील, मनीष विरकुड, रुपेश रणदिवे, विरेंद्र भगत, श्रीकांत खोत, नगरसेविका सुगंधा मकू, यास्मिन कादरी,नगमा खानजादा, अंकिता गुरव,रहिम कबले,बाबू सुर्वे, ॲड.कुणाल जैन,ललित जैन, आशिष दिवेकर, प्रवीण मयेकर,जाहिद कादिरी,अशोक पाटील, सुरेंद्र मकू,उमेश भोईर, महेश भगत, किरण सतविडकर, विनायक पाटील,नितीन पुलेकर,ओम पाटील,दिपक पालशेतकर, आशिष खोत उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर