
कोर्लई,ता. १४ (राजीव नेवासेकर) केरळ येथे दिनांक १० व ११ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या मास्टर्स कप २०२६ या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत तीन सुवर्ण, पाच रजत, नऊ कांस्यपदके पटकावल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
"मास्टर्स कप २०२६" ही राष्ट्रीय कराटे स्पर्धा नुकत्याच केरळ राज्यात वायनाड जिल्ह्यातील सुलतान बत्तेरी येथे संपन्न झाली. यात महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील १० कराटेपट्टूंची निवड करण्यात आली होती.
यामध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत तीन सुवर्ण, पाच रजत आणि नऊ कांस्य पदके पटकावली.
यात एच ओ सी एल पिल्लई रसायनी स्कूलच्या विद्यार्थ्यीनी शर्वरी अभिषेक तांबडकर दोन सुवर्णपदके, ईश्वरी अभिषेक तांबडकर १ रजत , १ कांस्यपदक, व त्रिशा नविन गट्टू १ रजत, १ कांस्यपदक .
जवाहर नवोदय विद्यालयाच्या ध्रुव शिल्पा कळके १ सुवर्ण, १ कांस्यपदक, अंजुमन इस्लाम उर्दू स्कूलचा अब्दुल रहमान कामिल कापसे ला १ रजत पदक तसेच छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयात शिकणारे काव्या नाक्ती १ रजत, १ कांस्यपदक , रेश्मा भोईर २ कांस्यपदक, आर्यन स्वप्निल गद्रे १ कांस्यपदक आणि जय गणेश ठाकूर १ कांस्यपदक यांनी पटकाविले.
सर्व कराटेपट्टूंना आंतरराष्ट्रीय पंच क्योशी- विजय चंद्रकांत तांबडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षक रेन्शी - अभिषेक गजानन तांबडकर व सेन्सई - आकांक्षा विजय तांबडकर, सेम्पाय - स्वप्ना अभिषेक तांबडकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशानंतर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या