कोर्लई,ता.१५(राजीव नेवासेकर) हैद्राबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या २६ व्या राष्ट्रीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील शुभम महेंद्र नखाते (अलिबाग) व शिव देवजी हिलम (ग.म.वेदक विद्या. ज्यु.काॅ., तळा ) यांनी रजत पदक पटकावले !
सिकई फेडरेशन ऑफ इंडिया आणि सिकई असोसिएशन ऑफ हैदराबाद वतीने येथील जी.एम.सी. बालयोगी संकुल , गच्चीबोली क्रीडा संकुलात संपन्न झाल्या होत्या.
सिकई असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष मजहर खान,सचिव रवींद्र गायकी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील एकूण १८ खेळाडूंनी भाग घेतला होता. यात रायगड जिल्ह्यातील दोन खेळाडूंची महाराष्ट्रातील संघात निवड झाली होती.स्पर्धेत रायगड मधील अलिबागच्या शुभम महेंद्र नखाते आणि शिव देवजी हिलम यांनी व्दितीय क्रमांक पटकावला.या खेळाडूंना मास्टर विजय चंद्रकांत तांबडकर आणि प्रियांका गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी कडून कौतुक व अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या