काशीद समुद्रात पुण्याचा पर्यटक बुडाला : चोवीस तासांनंतर सापडला मृतदेह
कोर्लई,ता.१९ (राजीव नेवासेकर) पर्यटनात प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रकिनारी पुण्याचा पर्यटक सोमनाथ भोसले बुडून बेपत्ता झाला होता. मुरुड पोलिस व स्थानिकांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी चोवीस तासांनंतर त्याचा मृतदेह सापडला आहे.
सोमनाथ राजेश भोसले वय 24 राहणार काळेपडळ, हडपसर, पुणे ( मुळ राहणार शिर्डी , ता. शिर्डी , जि. अहिल्यानगर ) येथून रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी काशीद बीच येथे दि.18/01/2026 रोजी दुपारी 15.00 वा. सुमारास त्याच्या मित्र मैत्रिणी सोबत एकूण 26श्रीनिधी कंपनी हडपसर पुणे असे फिरायला आले होते त्यातील वरील इसम हा हरवलेला होता. सदर इसम मिळून न आल्याने मुरुड पोलीस ठाणे मनुष्य मी. नं. 01/2026 दाखल करण्यात आला होता.
मुरुड पोलिस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गदमले, पोलिस हवालदार दसाडे, पोलिस शिपाई बारवे लाईफ गार्ड व सागर रक्षक दल यांच्या मदतीने शोध घेतला असता आज दि.19 जानेवारी रोजी 16.00 वा.सोमनाथ भोसले याचा मृतदेह काशीद बीच येथे सापडला असून पोलिस पुढील कार्यवाही करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या