कोर्लई,ता.१५(राजीव नेवासेकर)कोकण उन्नती मित्र मंडळ संचालित मुरुडच्या वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयात (बॅरिस्टर ए. आर. अंतुले संकुल) येथे राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात मुरूड जंजिरा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेविका यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या थोर व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा समाज घडविण्यातील वाटा उपस्थितांनी यावेळी अधोरेखित केला.
यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगर सेविकांचा सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. के. कांबळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचा अंगीकार करून शिक्षणासोबतच चारित्र्यनिर्मितीवर भर देण्याचे आवाहन केले. . तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच आज शिक्षणाचा मार्ग सर्वांसाठी खुला झाला व राजमाता जिजाऊ कौटुंबिक ,सामाजिक व राजकीय परिस्थितीवर मात करत कसे शिवबास घडविले व स्वराज निर्माण केले हे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. विश्वास चव्हाण यांनी स्वामी विवेकानंद,जिजाऊ व सावित्रीबाई च्या विचाराने प्रेरित होऊन विद्यार्थ्याने समाजासाठी चे आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. असे मत व्यक्त केले. अध्यक्ष वासंती उमरोटकर यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले तसेच राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडले, याचा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी इतिहासातून प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास मुरूड जंजिरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा वासंती उमरोटकर, समितीचे सदस्य डॉ. विश्वास चव्हाण व संदेश दांडेकर ,नगरसेविका प्रांजली मकू,प्रमिला माळी,देवयानी गुरव,प्रीता चौलकर,श्रद्धा अपराध मृणाल खोत,तरन्नूम फराश, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, प्रा.एस.एल.म्हात्रे,प्रा.नारायण बागुल,प्रा.श्रीशेल भैरगुंडे,प्रा.चिंतन पोतदार,प्रा.प्रणव बागवे,प्रा सिद्धेश सतविडकर ,प्रा. मुस्कान रज्जब, प्रा . रुफी हसवारे वरिष्ठ लिपीक गणेश लाड व अतिश आग्रावकर व विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा. एस.एल.म्हात्रे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.प्रवेश पाटील व प्रा.सीमा नाहीद यांनी तर प्रा.सीमा नाहिद यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या