कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील ताराबंदर येथील प्रतिक प्रमोद कणगी यांनी दि.१६ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद रायगड आणि पंचायत समिती मुरुड यांच्याकडे माहितीच्या अधिकारात अधिकृत तक्रार दाखल केली. याची दखल घेत १ जानेवारी २०२६ रोजी चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्यक्ष स्थळ पाहणी दरम्यान खालील धक्कादायक बाबी प्राथमिक स्वरूपात समोर आल्याचे समजते.
प्रतीक कणगी यांनी ३ एप्रिल २०२५ रोजी माहिती अधिकार (RTI) अंतर्गत ग्रामपंचायतीकडे विविध विकासकामांची यादी, खर्याचे तपशील, बिले, वर्क ऑर्डर आणि प्रमाणपत्रे मागितली होती. मात्र, प्रशासनाने विहित मुदतीत माहिती न दिल्याने त्यांनी प्रथम अपील दाखल केले. पंचायत समिती मुरुड येथे झालेल्या सुनावणीत माहिती देण्याचे आदेश देऊनही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर उशिरा मिळालेली माहिती ही अपूर्ण आणि कागदपत्रांमध्ये गंभीर विसंगती दर्शवणारी असल्याचे समोर आले.
'लोकशाहीत माहितीचा अधिकार हे नागरिकांचे शस्त्र आहे. शासकीय निधी हा पारदर्शकपणे होणे गरजेचे आहे. प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे, याबद्दल मी समाधानी आहे. आता केवळ अंतिम अहवाल सार्वजनिक होऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, हीच आमची मागणी असल्याचे प्रमोद कणगी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले."
संपूर्ण चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली असून, चौकशी अधिकारी आपला अंतिम अहवाल वरिष्ठांकडे सादर करणार आहेत.या अहवालात शेवटी काय निष्पन्न होते आणि दोषी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींवर काय कारवाई होते ? याकडे जनसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या