मुरुड-जंजिरा,ता.४(नैनिता कर्णिक)हिंदुस्थानाला स्वाभिमानाची शिकवण देणाऱ्या *राजमाता माँसाहेब जिजाऊ* आणि सबंध देशात स्त्रीशिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या आणि महिलांना शिक्षण देऊन समृद्ध करणाऱ्या *क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले* या दोन महान माउलींना जयंती निमित्ताने अभिवादन करत
जयंतीचे औचित्य साधून, शाळा क्र ३ व शाळा क्र २ मधील अंगणवाडीतील मुलांना, *धडा पाहिला गिरविन* आणि तोही मातृभाषेतूनच, म्हणून शाळेतील मुलांना अक्षर सराव व्हावा याकरिता सराव पाटी (खरड पाटी)चे वाटप मराठी शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी केले.
शिक्षण हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे अंग आहे आणि ते ही आपल्या मातृभाषेचं असेल तर याउपर काहीही नाही. मराठी शाळा आणि मराठी भाषेच्या उन्नतीसाठी प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न करावे.ही भावना मनात ठेवून,आज माय मराठीसाठी आणि मराठी शाळेसाठी एक छोटासा प्रयत्न केला.
यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका लघुपटाच्या माध्यमातून साकारणारी नवोदित अभिनेत्री जुईली गुंजाळ,ॲड.अंकिता माळी,युविका भगत,युवराज भगत,ॲड.मनिष माळी,सागर पाटील, सुशांत म्हात्रे,अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
मराठी शाळा व भाषा अबाधित रहावी व मराठी शाळांना पुन्हा सुगीचे दिवस आले पाहिजे.अशी भावना ॲड.मनिष माळी यांनी व्यक्त केली तर मराठी वाहिनीवर सुरू होणारी सावित्रीबाई फुले ही मालिका विद्यार्थी व पालकांनी आवर्जून पाहावी आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची संघर्षगाथा अनुभवावी.असे प्रतिपादन जुईली गुंजाळ यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या