कोर्लई,ता.२९(राजीव नेवासेकर)मुरुड-एकदरा-डोंगरी मार्गावर खोकरी आगरदांडा कडे जाणाऱ्या माझेरी रस्त्याची कामे मे महिन्यात करुनही अवघ्या सहा महिन्यांत पुन्हा खाच-खळगे व खड्डे पडून पार दुरावस्था झाली असून वाहने चालवताना वाहनचालकांची अक्षरशः डोकेदुखी ठरत आहे.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वेळप्रसंगी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
मुरुड कडून आगरदांडाकडे जा-ये करण्यात हा रस्ता जवळचा असून दोन कि.मी.अंतर वाचते, त्यामुळे या रस्त्याचा वापर केला जातो.यारस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खाच खळगे व खड्डे पडल्याने ते बुजविण्याची मागणी जोर धरत होती, संबंधित बांधकाम खात्याने याची दखल घेत कोट्यावधीचा निधी खर्चून मे २०२५ मधे या रस्त्याचे काम करण्यात आले, परंतु सहा महिन्यांत याठिकाणी डोंगरी ते माझेरी रस्त्याची परिस्थिती जैसे थे झाली,या रस्त्यावर उखडलेली खडी,पडलेल्या खाच खळगे व खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून याठिकाणी वेळप्रसंगी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाने यातलक्षपुरवून माझेरी रस्त्यावरील खाच खळगे व खड्डे बुजविण्यात यावेत.अशी मागणी वाहनचालक व प्रवासीवर्गातून जोर धरीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या