कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील आयुष हॉस्पिटलतर्फे आगरदांडा ग्रामपंचायतीत सरपंच आशिष हेदुलकर यांच्या सहका-यातून मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.
यावेळी आयुष हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर बालरोग तज्ज्ञ डॉ.अनिल गोस्वामी,दंततज्ञ डॉ.डायना, डॉ.सिद्धांत पाटील, डॉ.गीतांजली गरिमा आणि त्यांच्या टीमने आगरदांडा व आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी यामध्ये स्त्री रोग तज्ञ,बालरोग तज्ञ,दंत रोग तज्ञ आणि जनरल फिजिशियन तपासणी करण्यात येऊन मोफत औषधे देण्यात आली.
नांदगावच्या आयुष हॉस्पिटलतर्फे आगरदांडा ग्रामपंचायतीत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आल्याबद्दल परीसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या