कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर) शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुरुड तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान विभाग,उसरोली ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आम्ही संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खारिकवाडा येथे भरणाऱ्या आठवडा बाजारात पर्यावरण संतुल राखण्यासाठी प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळण्यासाठी अभियान राबविण्यात आले.
यावेळी श्रेया गद्रे, आम्ही संस्थेचे महेंद्रसर यांनी प्लॅस्टिक पिशवीच्या वापरामुळे होणारे फायदे व तोटे याबाबत माहिती देण्यात येऊन दिली आठवडा बाजारात प्लास्टिक पिशवी वापरास बंदी करण्यात आली.
ग्रामपंचायत प्रशासक प्रसाद माळी,वसंत दळवी कृषी विस्तार अधिकारी, श्रेया गद्रे मॅडम स्वच्छ समन्वयक,महेंद्र सर, मांदाडकर कृषी बाजार,समिती, ग्रामपंचायत अधिकारी खैरनार,पोलिस कर्मचारी, उसरोली -मजगाव ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या