Type Here to Get Search Results !

मुरुड शहर आगरी समाजाचा शिवसेनेला पाठिंबा अध्यक्ष शशिकांत फुलारे



मुरुड जंजिरा ( सुधीर नाझरे ) मुरुड शहरात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने प्रचाराला वेग आला आहे ,शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कल्पना पाटील आणि सर्व नगरसेवक याना शहर आगरी समाजाचा पाठिंबा आहे असे समाजाचे अध्यक्ष शशिकांत फुलारे यांनी जेष्ठ माजी नगराध्यक्ष अशोक धुमाळ यांच्या निवास्थानी झालेल्या सभेत सांगितले त्यावेळी समाजाचे अशोक शहापूरकर संजू रोटकर ,संतोष भायदे , विजय शापूरकर ,शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश घाटवल, शहर प्रमुख संदीप पाटील आदी मान्यवर होते 
    
आगरी समाजाच्या ४० महिला व ३० पुरुष मंडळींनी सभेला उपस्तीत होते ,समाजाचे प्रश्न व समाज विकसित होण्यासाठी नेहमी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी साहेब समाजाला मदत करतात .समाजातील तरुण मुलांना काम देण्याची जबाबदारी शिवसेना पार पडते अशी खात्री माजी नगराध्यक्ष अशोक धुमाळ यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर