कोर्लई,ता.२२(राजीव नेवासेकर)मुरुड-राजपुरी-जंजिरा किल्ला रस्त्यावर पावसाळ्यापासून एकदरा ते डोंगरी राजपुरी दरम्यान आडवळणाच्या रस्त्यावर झाडा-झुडपांच्या असलेल्या विळख्यामुळे,साईड पट्ट्या दिसत नसल्याने अपघाताची भिती व्यक्त होत असुन याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असलेल्या दुर्लक्षा बाबत पर्यटक, स्थानिक वाहन चालक व प्रवासीवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
मुरुड-राजपुरी जंजिरा किल्ला रस्त्यावर सातत्याने वाहनांची वर्दळ असुन गेल्या कित्येक महिन्यांपासुन मुरुड- एकदरा-डोंगरी-राजपुरी-जंजिरा किल्ला दरम्यान आडवळणाच्या रस्त्यालगत वाढलेल्या झाडा-झुडपांमुळे साईडपट्ट्या दिसत नसल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविण्यात कसरत करावी लागत असुन वेळप्रसंगी अपघाताची भिती व्यक्त होत आहे.
शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी वर्गाने यात तातडीने लक्ष पुरवन मुरुड-राजपुरी रस्त्यावर असलेला झाडा-झुडपांचा विळखा तातडीने हटविण्यात यावा. अशी मागणी पर्यटकांमधून वाहन-चालक व प्रवासीवर्गातून जोर घरीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या