Type Here to Get Search Results !

मुल्यांकन समितीने केली मुरुड आगाराची पाहाणी


कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर) हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुरुड आगार बसस्थानकाला मुल्यांकन समितीचे सिंधुदुर्ग विभागीय विभाग नियंत्रक दिपक घोडे, विभागीय अभियंता अक्षय केकरे यांनी आगार प्रमुख राहुल शिंदे यांच्या समवेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

     या मूल्यांकन समितीकडून बस स्थानकांची स्वच्छता, बसस्थानक व्यवस्थापन, स्त्री/पुरुष प्रसाधनगृहाची स्वच्छता, हरित बस स्थानक, बसेसची स्वच्छता, विद्यार्थी पास, बसस्थानक इमारतीची रंगरंगोटी, वाहक व चालक यांच्यासाठी असलेले विश्रांतीगृह, बस स्थानकातील मार्गदर्शक सूचना फलक याची पाहणी केली याचबरोबर बस स्थानकातील उपलब्ध सोयीसुविधा तसेच स्थानकात करायच्या असलेल्या सुधारणा यासंदर्भात मुरुड आगार प्रमुख राहुल शिंदे  यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी आवश्यक त्या योग्य सूचनाही यावेळी समितीकडून आगार व्यवस्थापक, बस स्थानक वाहतूक नियंत्रक तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या.

 यावेळी सहायक वाहतूक नियंत्रक चंद्रकांत कारभारी,लेखाकार अक्षय भोईर, वरिष्ठ लिपिक साईश कारभारी,ॲलोकेशन अण्णा शिंदे, कर्मचारी वृंद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर