यावेळेस व्यासपीठावर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश शेरेकर,अलिबाग तालुका अदिवासी संघटना अध्यक्ष धनाजी शिद, गंगोत्री म्हात्रे जे. एस.डब्ल्यू.मॅजीक बस,आदि मान्यवर उपस्थित होते.
. सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन डॉ.जयपाल पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यानंतर सामुहिक संविधान वाचन करण्यात आले.
संपुर्ण भारतात संविधान दिनाचे महत्व आहे, त्या बरोबर आपण सारे जण जंगलात रहातो,त्याचे रक्षण करणे आपल्या हातामधे आहे,आपले वडील, भाऊ, कामावरून येतात,जातात तेव्हा विडी,सिगारेट ओढत जाऊ नका,ज्यामुळे जंगलात वणवे पेटतात त्यामुळे देशातील नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होते.यासाठी संविधान दिनानिमित्त प्रत्येकाने घरी सांगावे.असे सांगितले.
यावेळेस सुषमा म्हात्रे, स्वाती पाटील, अर्चना रामटेके,सुनिता गडखळ,प्रकाश तिवरे,दिनेश डोलकर, जगदीश मेंगाळ,तुषार घुमाळ,विकास रणपिसे शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिकांत पवार तर सुनिता दांडेकर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या