कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील आयुष हॉस्पिटलमध्ये रविवार दि.३० नोव्हेंबर रोजी सकाळी १०-०० वा.ते दुपारी ४-०० वा.यावळेत महिला -बालकांसा़ठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात मुलांच्या वाढीचे निरीक्षण,लसीकरण आणि रोगप्रतिबंधक उपाय,पौष्टिक आहार आणि आरोग्यदायी सवयी,आरोग्य समस्यांचे लवकर निदान करून बालरोग तज्ञांकडून सल्ला दिला जाणार आहे तसेच महिला आरोग्य विषयक विविध समस्या पालक आणि काळजी घेणाऱ्यांना आधार स्त्रीरोग आरोग्य (मासिक पाळीच्या समस्या, PCOS, वंध्यत्व, रजोनिवृत्ती)प्रसुती काळजी (गर्भावस्था, प्रसूती आणि प्रसूतीनंतरची काळजी), मासिक पाळीच्या समस्या, पेल्विक वेदना, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तपासणी तज्ञ डॉ.गीतांजली गरिमा व आयुष हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर बालरोग तज्ञ डॉ.अनिल गोस्वामी आणि त्यांच्या टिमतर्फे करण्यात येणार आहे.
तरी मुरुड शहरासह तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील महिला व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन नांदगाव आयुष हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या