कोर्लई,ता.२९(राजीव नेवासेकर)अलिबाग तालुक्यातील तळाशेत येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला.
आपत्ती व्यवस्थापन तज्ञ तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ.जयपाल पाटील, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष वैशाली भोईटे,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, उपशिक्षिका जस्मिन शेख,विद्यार्थी, शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीला उपशिक्षीका जस्मिन शेख यांनी संविधान वाचन करून उपस्थित पाहुण्यांची ओळख करून दिली.यानंतर मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे यांनी डॉ.जयपाल पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन विषयी व संविधान लिहिण्यास लागलेला काळ व देशातील सर्व जाती धर्मातील जनतेच्या कल्याणासाठी संविधान तयार केल्याची माहीती देऊन यात्रेत व प्रवासात आपले आई,बाबा पासुन दूर अथवा हरविले तर न घाबरता पोलीस मामा अथवा मावशी यांचे जवळ जावे,अनोळखी सोबत जाऊ नये आणी आपल्या आई-वडील, काका,मामा यांचे मोबाईल क्रमांकाची चिठ्ठी जवळ ठेवावी म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल. असे प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी यावेळी सांगितले. शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष वैशाली बोईटे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या