कोर्लई,ता.२६(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील आगरदांडा ते नांदले रोह्याकडे आगरदांडा गावातून जाणा-या रस्त्याची अनेक ठिकाणी खाच खळगे व खड्ड्यांमुळे पार दुरावस्था झाली असून याकडे संबंधित बांधकाम खात्याचे दुर्लक्ष असल्याबद्दल वाहनचालक व नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मागील पावसाळ्यात पासून या रस्त्यावर खड्डे पडले असून या ठिकाणी काही जणांना अपघाताला सामोरे जावे लागले तर वेळप्रसंगी कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.याबाबत येथील ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांनी बांधकाम खात्याकडे वेळोवेळी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येते आहे.
शासनाच्या संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष पुरवून आगरदांडा गावातून नांदले रोह्याकडे जाणा-या रस्त्यावरील खाच खळगे व खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात यावे. अशी मागणी सरपंच आशिष हेदुलकर, उपसरपंच संतोष पाटील, सदस्य युसुफ अर्जबेगी,सुहेल अर्जबेगी, प्रसाद भाटकर, सुर्यकांत तोडणकर, नरेंद्र हेदुलकर,समीप अडुळकर, वाहनचालक व ग्रामस्थ यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या