Type Here to Get Search Results !

वसंतराव नाईक महाविद्यालयात संविधान दिन



कोर्लई,ता.२६(राजीव नेवासेकर) मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिन साजरा करण्यात आला.

  संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.यानिमित्ताने वसंतराव नाईक महाविद्यालयात विविध माहितीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

  यावेळी ॲड.विनायक शेडगे, ॲड.फैसल जामदार,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, डॉ.एस.एल.म्हात्रे,प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे,प्रा.डॉ.एन.एन.बागूल,प्रा.डॉ.सीमा शाहिद,प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर,प्रा.चिंतन पोतदार,प्रा.प्रवेश पाटील,प्रा.प्रणव बागवे, कर्मचारी वृंद उपस्थित होते.

  भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय घटनेबाबत जागृकता, घटनात्मक अधिकार व कर्तव्याबद्दल ॲड.फैसल जामदार यांनी मार्गदर्शनपर माहिती दिली तर ॲड.विनायक शेडगे यांनी भारतीय संविधानाने दिलेले मुलभूत अधिकार, समानतेचा, स्वातंत्र्याचा, शैक्षणिक शोषणा विरोधात अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन प्रा.डॉ.एस.एल.म्हात्रे यांनी तर प्रा.डॉ.एन.एन.बागूल यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर