कोर्लई,ता.३०(राजीव नेवासेकर)भारतीय वर्षा वरील प्रत्त्येक व्यक्ती जेष्ठ नागरिकत्वास पात्र असेल त्यांना शासकीय कोषातुन दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत मानधन, आरोग्य, व्यक्तीगत संरक्षण, रस्त्यावर पादचारी मार्ग, सामाजिक आदर,ऑट्रासिटी कायद्याच्या धर्तीवर विशेष आचार संहिता देऊन सर्वा साठी केंद्रसरकार व महाराष्ट्र सरकारने कॅबिनेट दर्जाचे स्वतंत्र मंत्रालय द्यावे.अशी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष विजय दादा देशमुख यांनी दिली असून त्याचे सोबत राष्ट्रीय माध्यम संयोजक जेष्ठपत्रकार,संपादक डॉ . जयपाल पाटील,ईस्टीम 2डेचे संजय जोशी हे उपस्थित होते.
अर्थक्रांती व भारतीय जेष्ठ नागरिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने संपुर्ण देशभरात भारतीय स्त्री-पुरूष शेतकरी,मजूर, व्यापारी, उद्योजक यांना जात,धर्म, प्रांत भाषा यांचा भेदभाव न करता त्यांना दर महा 10 हजार रुपयांपर्यंत मानधन द्यावे, त्याच्या सन्मानासाठी आचार संहिता बनवावी यासाठीचे निवेदन पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिले असून संपुर्ण देशभरात आंदोलन करण्यात येत आहे,राजे छत्रपती शिवाजीमहाराज यांना गडावर नतमस्तक होऊन रायगड जिल्ह्यात या आंदोलनाचा शुभारंभ होणार आहे.यासाठी सामान्य सभासद वर्गणी वार्षिक रु.20/- व पदाधिकारी रु.500/-घेण्यात येणार आहे.संघटनेचे कार्य सन 2015 पासून सुरु असून धर्मादाय आयुक्त लातूर येथे नोंदणी केलेली आहे. केंद्र सरकार आमच्या प्रस्तावाचा गांभिर्याने विचार करत आहे.असे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दादा देशमुख यावेळी म्हणाले तर महाराष्ट्रात जेष्ठ नागरिक संघटना आहेत,पण त्याची वर्गणी शेतमजूर, शेतकरी यांना खिशाला परवडत नाही म्हणून संस्थेने अल्प वर्गणी ठेवली आहे.त्यानां शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा मिळवुन देण्यासाठी आमचे सेवाभावी पदाधिकारी देशभरात जोडले आहेत.असे संजय जोशी यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या