कोर्लई,ता.२(राजीव नेवासेकर)मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे व वैद्यकीय अधीक्षक डॉ.उषा चोले यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक एड्स दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे, प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर, डॉ.सीमा नाहिद प्रा.प्रवेश पाटील, ग्रामीण रुग्णालयाच्या समुपदेशक पूजा तोंडले,टेक्नीशियन समीर धांडूरे यावेळी उपस्थित होत्या.
सुरुवातीला सर्व उपस्थिताचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
एच.आय.व्ही(एड्स) हा आजार असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्याने एचआयव्हीग्रस्त व्यक्तीचे सोई सिरिज निरोगी व्यक्तीला वापरल्यामुळे होतो आणि एचआयव्ही ग्रस्त आई असेल तर तिच्या होणाऱ्या बाळाला हा आजार होतो.या चार कारणातूनच हा आजार होत असल्याचे तसेच अशक्तपणा,थकवा,अंगाला पुरळ येणे, वजन कमी होणे, खोकला येणे, तोंडाला अल्सर येणे.अशी काही लक्षणे आढळल्यास जवळच्या ग्रामीण रुग्णालयात एचआयव्ही टेस्ट करून घ्यावी.असे ग्रामीण रुग्णालयाच्या समुपदेशक पूजा तोंडले यांनी मार्गदर्शन करताना सांगून समाजातील भेदभाव कमी करण्याबाबत मार्गदर्शन केले आणि कलम17hiv act विषयी माहिती दिली.यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांनी एड्स बाबत माहितीपूर्ण दृष्टिकोन ठेवणे व चुकीच्या समजुती दूर करणे ही काळजी गरज असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या