कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर) आगामी काळात होणा-या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरुड मध्ये रणधुमाळीला सुरुवात झाली असून महाविकास आघाडी च्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष - मनसे युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड.अंकिता मनिष माळी व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांनी ग्रामदैवत कोटेश्वरी मातेचे दर्शन व आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला !
आगामी होणा-या नगरपरिषद निवडणुकीत मुरुडमध्ये इंडिया आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने आघाडी केली असून थेट नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी दहा उमेदवार उभे केले आहेत.
सुरुवातीला ग्रामदैवत कोटेश्वरी मातेची पूजा करून शुभाशीर्वाद घेत येऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील,जिल्हा उपाध्यक्ष शैलेश खोत,शेकापचे ज्येष्ठ नेते मनोहर बैले,तालुका चिटणीस विजय गीदी, दोन्ही पक्षांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या