Type Here to Get Search Results !

नगरपरिषद निवडणुक-२०२५ मुरुडमध्ये रणधुमाळीला सुरुवात

 

कोर्लई,ता.२२(राजीव नेवासेकर)मुरुड नगरपरिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १ नगराध्यक्षा पदासाठी व ३ नगरसेवक उमेदवारांनी मागे घेतले अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होत असून २० नगरसेवक पदासाठी ५८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

  नगरपरिषद निवडणुकीसाठी रणधुमाळीला सुरुवात झाली असून भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक १(ब) मधील नगरसेवक पदाचे उमेदवार जनार्दन सदाशिव कंधारे, प्रभाग क्रमांक २(अ) सुधीर भिकू पाटील, प्रभाग क्रमांक २(ब) सीमा जनार्दन कंधारे, प्रभाग क्रमांक ३(ब)उमेश रामचंद्र माळी व प्रभाग क्रमांक ४(ब) मधील उमेदवार भाविका परेश किल्लेकर यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह शेग वाडा(सुभाष चंद्र बोस मार्ग) येथील श्री साईबाबा व ग्रामदैवत कोटेश्वरी मातेचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला.

   मुरूड जंजिरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता १ नगराध्यक्षा व १२ नगरसेवकाचे अर्ज छाननीत अपात्र झाले होते.४ नगराध्यक्षा तर ६२ नगरसेवक उमेदवारी अर्ज वैद्य ठरविण्यात आले होते.तद्नंतर काल दिनांक २० नोव्हेंबर ला प्रभाग क्रमांक ६ अ सर्वसाधारण महिला नगरसेविका करिता रुमाना मुदस्सर मजगांवकर यांनी भरलेला उमेदवारी अर्ज  यांच्या कडुन  मागे घेतला. आज शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी  प्रभाग क्रमांक ९ ब मधून अपक्ष उमेदवार- अनिता जगदीश सरपाटील,अपक्ष उमेदवार - सुवर्णा प्रकाश सरपाटील, प्रभाग क्रमांक ६ ब मधुन उमेदवार- शरयु विनोद भगत व थेट नगराध्यक्षा साठी शरयु विनोद भगत यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार-आदेश डफळ यांच्या कडून मागे घेतला गेला.

 यामुळे २० नगरसेवकांसाठी ५८ उमेदवार तर थेट नगराध्यक्षा पदाकरीता तिरंगी लढत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर