कोर्लई,ता.१८(राजीव नेवासेकर) मुरुड -कुंभारवाडा येथील रहिवासी अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक नितीन राजपूरकर हे आपली ३३ वर्षांची सेवा उत्तम प्रकारे पुर्ण करुन सेवानिवृत्त झाले.त्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग व कुंभार समाज,सत्यम युवक मंडळ, ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ठाणे - जव्हार येथे नितीन राजपूरकर हे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात दि.३० नोव्हेंबर १९९२ मध्ये कनिष्ठ लिपिक सेवेत रुजू झाले.येथील अतिदुर्गम भागात ८ वर्षे चांगल्याप्रकारे सेवा करुन अलिबाग येथे सार्वजनिक बांधकाम विभागात दि.१ जुलै १९९९ रोजी कनिष्ठ लिपिक पदावर १२ वर्षे सेवा करुन सन.२००४ ते दि.३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वरिष्ठ लिपिक पदावर उत्तम प्रकारे सेवा करुन सेवानिवृत्त झाले.
अलिबाग येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकारी अभियंता एम.एम.धायतडक यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नितीन राजपूरकर व कुटुंबियांचा श्रीगणेश व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तसेच कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गातर्फे वैयक्तिक प्रतिमा (फोटो) देण्यात येऊन पुढील यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.मुरुड येथे कुंभार समाज, सत्यम युवक मंडळ,ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नितीन राजपूरकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मुरुड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष जयवंत अंबाजी,सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता एम.एम.धायतडक,उप अभियंता अजित सांगळे, मुरुड शाखा अभियंता यू.एस.राठोड, अधिकारी, कर्मचारी वृंद तसेच मुरुड येथे झालेल्या कार्यक्रमात नारायण बिरवाडकर, संदीप राजूरकर, दत्तात्रेय राजपूरकर, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.विश्वास चव्हाण, दिपेश राजपूरकर,सुमीत दर्गे, अनंता म्हसाळकर, अरुण म्हसाळकर, अवधूत चव्हाण, प्रसाद चव्हाण, समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या