कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर) मुरुडमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरु असलेली आधार सेवा बंद असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन दहा दिवसांत आधार सेवा उपलब्ध न झाल्यास या विरोधात तहसील कार्यालयासमोर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे अध्यक्ष अरविंद गायकर तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी जिल्हाधिकारी -रायगड यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी तहसील कार्यालयात देण्यात आलेले निवेदन नायब तहसीलदार संजय तवर यांनी स्विकारले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मुरुड शहरांतील नागरीक गेले अनेक दिवस (सुमारे वर्षभर) आधार सेवेपासून वंचीत आहे. आजच्या घडीला प्रत्येक कामा करीता आधार कार्डची गरज लागते. महिलांना लाडकी बहिणीसाठी, संजय गांधीच्या लाभारत्याना शासकीय, निमशासकीस कर्मच्याऱ्याकरीता, शेतक-याकरीता, विदयार्थ्यांकरीता आधार कार्डची गरज असते. परंतु गेली अनेक दिवस मुरूड शहरात आधार सेवा उपलब्ध नसल्यामुळे कित्येक नागरीकांना शासकीय योजनापासुन बंचीत रहावे लागत आहे.
सन 2013 पासून उदय सबनिस यांनी मुरूड येथे आधार केंद्राची सुरुवात करून मुरुड तालुक्यातील नागरीकांना खऱ्या अर्थाने आधार दिला. त्यांनी आधार केंद्र व महा ई सेवा केंद्र सुरू करून नागरीकांना अनेक शासकीय सेवा उपलब्ध करून दिले. त्याच्या मार्फत विविध शासकीय योजनांची माहिती देउन नागरीकांनी लाभ मिळून दिला. pm किसानचे लाभार्थी, संजय गांधी, निवृत्ती वेतन लाभार्थी,विदयार्थी करीता शिष्यवृत्ती, विविध व इतर योजनाची माहिती देउन लाभार्थीयांना मदत केली होती. सन 2021 मध्ये आपल्या सुचनेनुत्तार उदय सबनिस यांना तहसिल कार्यालयातील एक खोली उपलब्ध करून देण्यात आली होती, परंतू काही दिवसांपासून त्यांच्या आधार केंद्रवरील आधार नोंदणी बंद झाली आहे.
सदरची आधार नोंदणी बंद असल्याने येथील नागरीकांना आधारच्या बारीक-सारीक कामा करीत रोहा, आलिबाग येथे जावे लागते. जेथे आधारच्या नावा खाली नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.यापुर्वी मुरुड मध्ये पोस्ट ऑफिस व बॅंक ऑफ इंडिया ठिकाणी असलेली आधार सेवा पुन्हा उपलब्ध देण्यात यावी तसेच पात्र लाभार्थ्यांना आधार सेवा सुरु करण्याची संधी देण्यात येऊन येत्या दहा दिवसांत याठिकाणी आधार सेवा सुरु न झाल्यास नाईलाजास्तव याविरोधात तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यावाचून पर्याय राहाणार नाही.असे पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असून सदर निवेदनाच्या प्रती उपजिल्हाधिकारी -रायगड, पोलिस अधीक्षक, तहसीलदार -मुरुड, पोलिस निरीक्षक, यांना देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या