Type Here to Get Search Results !

बोर्लीतील रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याने भक्तगण धन्य धन्य झाले !


कोर्लई,ता.१३(राजीव नेवासेकर)अनंत श्रीविभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी व पिठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशिर्वादाने रत्नागिरी -नाणिज दक्षिणपीठ नाणीजधामच्या वतीने मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील हर्षोल्हासात संपन्न झालेल्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याने भक्तगण धन्य धन्य झाले !

       यादिवशी सर्वप्रथम बोर्लीतील यजमान जितेंद्र पाटील यांच्या निवासस्थानापासून श्रींच्या पादुका वाजत गाजत कार्यक्रम स्थळी येताना मुख्य बॅनर, ढोलपथक,कलशधारी महिला,निशाणधारी पुरुष, रामपंचतन देखावा,विविध देखावे,कोळीनृत्य, भजनपथक,माऊलींचा रथ,छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी  खालुबाजा, लेझीमपथक व शेवटी भक्तगण अशी पथके खास आकर्षण होती.

    कार्यक्रमस्थळी सर्वप्रथम श्रींच्या पादुकांचे आगमन झाल्यानंतर गुरुपूजनासह सामाजिक उपक्रमांतर्गत रामानंद संप्रदायातर्फ अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी व महेश मोहिते यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना६०सायकलींचे वाटप करण्यात आले.त्यानंतर गुरुपूजन व श्रींची आरती, तदनंतर ज.न.म. प्रवचनकार शोभा बेलदार यांचे सुश्राव्य सुमधूर बहारदार प्रवचन झाले. त्यानंतर उपासक दिक्षा,सिद्ध पादुका दर्शन व नंतर पुष्पवृष्टीने कार्यक्रमाची सांगता झाली.

   संपूर्ण रायगड जिल्ह्यातील हजारों भक्तगणांनी या सिध्द पादुका दर्शन सोहळ्याचा लाभ घेतला.पाच ते सहा हजार भक्तगण उपस्थित होते. यातील ३१५ जणांनी उपासक दिक्षा घेतली तर 780 गुरुबंधूनी गुरु पूजन केले.

      रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे धर्मकार्य आणि बोर्लीतील अभूतपूर्व सिद्ध पादुका दर्शन सोहळा पाहून आपण भारावून गेलो असल्याचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी सांगितले. यावेळी ॲड .महेश मोहिते साहेब,पीठ प्रसिद्धी प्रमुख राजन बोंडेकर,पीठसहाय्यक गणेश मोरे,पीठ महिला निरीक्षक राधिका पाटील,पीठ लेफ्टनंट राजेंद्र खांबल,पीठ युवा निरीक्षक सुनील वीर, पीठ जनगणना प्रमुख तुषार कदम,पीठ धर्मक्षेत्र प्रमुख कुमार पवार, प्रोटोकाल अधिकारी विष्णू कदम,दक्षिण रायगड ज़िल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी,उत्तर रायगड ज़िल्हाध्यक्ष दिनेश पाटील ज़िल्हा कर्नल चंद्रकांत लोणशीकर, उत्तर रायगड कर्नल सुजित पाटील,महिला ज़िल्हाध्यक्ष अंजली जगताप,मुरुड तालुका अध्यक्ष अंकुश वाडकर, सचिव संतोष चोरघे,संतोष घाग, बाबा डायला ज़िल्हा युवाध्यक्ष भरत थिटे,सर्व ज़िल्हा व तालुका कमिटीसह हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दक्षिण रायगड सेवा समिती, उत्तर रायगड सेवा समिती सर्व गुरुबंधू-भगीनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर