कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर)मुरुड येथील रहिवासी ठाणे येथील समर्थ भारत व्यासपीठांतर्गत चालवण्यात येणाऱ्या सिग्नल शाळेच्या सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणा-या अनिल पुलेकर यांचा या व्यासपीठातर्फे नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला.
गेल्या 4-5 वर्षांपासून अनिल पुलेकर दरवर्षी एका विद्यार्थ्याचे वार्षिक पालकत्व स्वीकारत आहेत आणि या उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी अनेकांना प्रोत्साहित करत आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी योगदानाबद्दल समर्थ भारत व्यासपीठातर्फे आज धनत्रयोदशीच्या दिवशी दि.18 ऑक्टोबर रोजी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात उल्हास कारले यांच्या हस्ते अनिल पुलेकर यांना मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. पुलेकर यांच्या सामाजिक बांधिलकी आणि समर्पणामुळे सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल होत आहे. त्यांच्या कार्याने समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या