कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर)रायगड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रणालीला आकार देण्याच्या उद्देशाने, गणित आणि विज्ञान शिक्षकांना अलीकडेच राष्ट्रीय स्तरावरील "रचनावाद" प्रशिक्षण मिळाले. हे प्रशिक्षण आंध्र प्रदेशातील कुप्पम येथील अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन येथे आयोजित करण्यात आले होते. यासाठी रायगड जिल्ह्यातील आठ शिक्षकांची निवड करण्यात आली होती.
रायगड जिल्ह्यातील आठ शिक्षक रचनावादावर प्रगत दृष्टिकोन घेऊन परतले. महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभाग आणि अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनच्या सहकार्याने हे महत्त्वाचे प्रशिक्षण ७ ते १० ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील फक्त ८ शिक्षकांची निवड करण्यात आली, ज्यात मुरुड तालुक्यातील जंजिरा विद्या मंडळाचे सर एस ए हायस्कूल येथील संदेश चोरघे, श्रीवर्धन तालुक्यातील अमित पाटील, पोलादपूर तालुक्यातील येथील प्रभू गावंडे, कर्जत तालुक्यातील आनंद सावंत, पाली तालुक्यातील नमीता वानखेडे, उरण तालुक्यातील सूहास नाईक, गोरेगाव तालुक्यातील योगेश कासरेकर, महाड तालुक्यातील केवल पाटील यांची निवड करण्यात आली होती. ४ दिवसांच्या या कार्यशाळेत शिक्षकांना व्यावहारिक प्रयोगांद्वारे रचनात्मक दृष्टिकोन शिकण्याची संधी मिळाली. त्यांनी कुप्पमच्या गणित, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र आणि कला प्रयोगशाळांना भेट दिली. त्यांनी आयुर्वेदिक वनस्पती, दुर्मिळ वनस्पती, फुलपाखरे आणि पक्ष्यांसह निसर्गाचा अनुभव घेतला. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना एक नवीन दिशा मिळाली आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या