कोर्लई,ता.२०(राजीव नेवासेकर) मुरुडच्या पद्मदुर्ग व्यावसायिक मंडळातर्फे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना व विहूर गावातील आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.यावेळी येथील विहूर येथील आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसून आले !
मुरुड येथील समुद्र किनारी व्यवसाय करणाऱ्या स्टॉल धारक यांनी स्थापन केलेल्या पद्मदुर्ग व्यावसायिक मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्याचाच भाग ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना व जवळपासच्या विहूर येथील आदिवासी बांधवांना मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांच्या पुढाकारातून दिवाळी फराळ वाटप करण्यात आला.पद्मदुर्ग व्यावसायिक मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे याठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याबद्दल व फराळ वाटप करण्यात आल्याने आदिवासी वाडीतील मुलांची दिवाळी गोड झाली असल्याची प्रतिक्रिया स्थानिक बांधवांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी पद्मदुर्ग मंडळ अध्यक्ष अरविंद गायकर, उपाध्यक्ष दिव्या सतविडकर, सचिव शैलेश वारेकर, सहसचिव दिव्येश बोरढे,दिपक जोशी,दुर्वांकुर बोरढे , इम्तियाज शादाब, संतोष मयेकर सदस्य तसेच ग्रामीण रुग्णालयातील लिपिक ओमकार कोरमकर, परिचारिका,स्टॉफ, आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते
आदी.मान्यवर उपस्थित होते.
(फोटो घेणे)
________________________________________
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या