![]() |
कोर्लई,ता.१०(राजीव नेवासेकर) मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राध्यापिका सेवेत कार्यरत असलेल्या डॉ.सिमा नाहीद यांचा नुकतेच मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट उर्दू अकॅडमी कार्यक्रमात 'बहारे उर्दू इन मुंबई 'या कार्यक्रमात"उदाहरणार्थ शिक्षक" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यातआले.
प्रा.डॉ.सीमा नाहीद या उत्कृष्ट प्राध्यापिका असून त्यांचे शिक्षण MA,Phd,SET आहे, त्यांनी आपल्या सेवेला AR Undre या शाळेमधून सन 2000 पासून सुरुवात केली, सन. 2009 पर्यंत उत्तम प्रकारे सेवा करुन वसंतराव नाईक महाविद्यालय-म्हसळा येथे सन 2009 ते 2016 पर्यंत तसेच मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात 2017 पासन उत्तम प्रकारे सेवा बजावत आहेत.
. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवेबद्दल पोचपावती महाराष्ट्र स्टेट उर्दू साहित्य अकॅडमी तर्फे त्यांना" उदाहरणार्थ शिक्षक" या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.
या सुंदर क्षणाच्या वेळी त्यांनी आपले पिताश्री"( शकील शहाजहान") यांचे स्मरण करून आपल्या यशाचे सर्व श्रेय वडिलांना दिले.सिमा नाहीद यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सलाम हाल्डे, जावेद खान, ताबीर,तमशील, फरहत बेगम, तसेच वसंतराव नाईक महाविद्यालय मुरुडचे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे,सर्व प्राध्यापक ,शिक्षक वृंद कर्मचारी व सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी अभिनंदन करुन पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या