कोर्लई,ता.१०(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील ताराबंदर गावाला लाखों रुपये खर्चूनही गेल्या सात महिन्यांपासून पाणी टंचाई भासत असून अखेर महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून तातडीने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली.
पावसाळ्यात नैसर्गिक स्तोत्र असणाऱ्या झऱ्याचे पाणी येथील लोकांना प्यावे लागत होते. परंतु आता पाऊस थांबला आहे. त्यामुळे नैसर्गिक पाणी आटले असून येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ताराबंदर येथे ८५ घरे असून सुमारे ४०० लोकवस्ती आहे.अद्याप पाणी पुरवठा न झाल्याने या भागाला जीवन जगणे मुश्किल झाले आहे. येथील महिला डोक्यावर हंडा घेऊन ग्रामपंचायतीत आल्या.यावेळी सरपंच व ग्रामसेवक अनुपस्थित होते.
आमच्या प्रतिनिधिने सरपंचांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांन महत्वाच्या कामासाठी मुरुडला आले असल्याचे सांगितले.
यावेळी महिला,ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
ताराबंदर गावात पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न आहे. ही बाब सत्य आहे. येत्या दोन दिवसात ताराबदर येथील ग्रामस्थांना पाणी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असून लवकरच या गावाला पाणी मिळेल, अस मी आश्वासन देतो.असे तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.राजेद्रकुमार खताळ यांनी संपर्क साधला असता सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या